बांगलादेशी नागरिक बनला रत्नागिरीकर...शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस, भानगड नेमकी काय?

बांगलादेशी नागरिक बनला रत्नागिरीकर…शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस, भानगड नेमकी काय?

| Updated on: Jan 07, 2025 | 3:36 PM

रत्नागिरीतील शिरगाव ग्रामपंचायतीला मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावली आहे. याप्रकरणी तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक चौकशीच्या फेऱ्यात यामुळे अडकले आहेत.

रत्नागिरीमध्ये एका बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. रत्नागिरीतील शिरगाव ग्रामपंचायतीकडून बांगलादेशी नागरिकाला हा जन्मदाखला देण्यात आला आहे. यासंदर्भात रत्नागिरीतील शिरगाव ग्रामपंचायतीला मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावली आहे. याप्रकरणी तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक चौकशीच्या फेऱ्यात यामुळे अडकले आहेत. दरम्यान, रत्नागिरीमध्ये एका बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला दिल्याने देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, घुसखोरी करून आलेल्या बांगला देशींकडूनच नव्हे तर इतर राज्यातून आलेल्यांकडून रत्नागिरीतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जन्मदाखले मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. शुक्रवारी झारखंडच्या दोन तरुणांकडून रत्नागिरी नगर परिषदेत जन्मदाखला काढून मिळेल का? अशी विचारपूस करून आल्याची माहिती आहे. रत्नागिरी तालुक्यात अनेक मोठमोठ्या कंपन्या असून, त्याठिकाणी परप्रांतीय आणि बांगलादेशी कामगार वर्ग आहे. या परराज्यातील काही कामगारांकडून रत्नागिरीत जन्म झाल्याचा दाखला मिळवण्यासाठी धडपड सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Jan 07, 2025 03:36 PM