Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकींची हत्या करणारे बिश्नोई गँगशी सबंधित, तपासातून काय आलं समोर?
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकींवर गोळीबार करण्यात आला यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या हत्या प्रकरणात बिष्णोई गँगचा संबंध असल्याचं समोर आलं आहे. दोन्ही आरोपींच्या प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुंबईच्या वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये बाबा सिद्दिकी यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून मुंबई क्राईम ब्रांच यूनिट 3 मध्ये कसून चौकशी केली जात आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी बिष्णोई गँगशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही आरोपींच्या प्राथमिक चौकशीत मुंबई पोलिसांना ही माहिती मिळाली आहे. पोलिसांकडू अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची मुंबई क्राईम ब्रांच यूनिट 3 मध्ये चौकशी करण्यात आली असता या चौकशीतून माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधून आलेल्या तीन शूटर्सने गोळीबार केला. बाबा सिद्दिकींची हत्या करणारे आरोपी हे बिष्णोई गँगशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. या हत्या प्रकरणातील फरार आरोपी हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती इतर दोन आरोपींनी दिली आहे.