पुण्यात भाजप आक्रमक, पुणे विद्यापीठ परिसरात आंदोलन सुरू, नेमकं काय घडलं?

पुण्यात भाजप आक्रमक, पुणे विद्यापीठ परिसरात आंदोलन सुरू, नेमकं काय घडलं?

| Updated on: Nov 03, 2023 | 2:55 PM

पुणे विद्यापीठात मुलांच्या वसतिगृहाच्या कपडे धुण्याच्या जागेजवळील भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आल्याचा प्रकार काल समोर आला. या घटनेचे पडसाद विद्यापीठाच्या आवारात काल उमटले तर आज भाजप देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे

पुणे, ३ नोव्हेंबर २०२३ | पुणे विद्यापीठाच्या भिंतीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याने पुण्यात भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे विद्यापीठाच्या परिसरात दोन गट आमने-सामने आले असून पुणे भाजपकडून विद्यापीठ परिसरात आंदोलन सुरू आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं हे आंदोलन सुरू आहे. विद्यापीठाच्या भिंतीवर आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे भाजप आक्रमक होत त्यांनी याप्रकरणी पुणे विद्यापीठाकडे कारवाईची मागणी केली आहे. यादरम्यान, पुणे विद्यापीठ परिसरात मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्तेय दाखल होत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरूद्ध आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या समाज कंटकांचा जाहीर निषेध व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Nov 03, 2023 02:55 PM