Mumbai | भाजपचं शिवाजी पार्क परिसरात आंदोलन, शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांची गर्दी
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दादर, वरळी, माहिम, माटुंगा या भागात शिवसेना-भाजप वारंवार समोर येत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना भवन येथे झालेल्या राड्यानंतर भाजपने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसलं आहे.

शिवसैनिकांकडून शिवसेना भवन परिसरात बंदोबस्त
आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपने शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करण्यात येत आहे. बारा आमदारांना निलंबित केल्याप्रकरणी हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजप कार्यकर्ते सेनाभवन परिसरात येण्याची शक्यता आहे. यामुळे असंख्य शिवसैनिकांनी शिवसेना भवन परिसरात मोठी गर्दी केली आहे. अनेक शिवसैनिक हे सेना भवन परिसरात जमा झाले आहेत. या शिवसैनिकांकडून शिवसेना भवन परिसरात बंदोबस्त दिला जात आहे.
Published on: Jul 10, 2021 02:44 PM
Latest Videos