सगेसोयऱ्यांमुळे सरकार अडकलं? सगेसोयऱ्यांबद्दल भाजपचं एकनाथ शिंदेंकडे बोट; सरकारच्या तीन पक्षांची भूमिका काय?
ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी असतील त्यांना आरक्षण द्यायला ना सत्ताधाऱ्यांचा विरोध आहे ना विरोधकांचा... हा निर्णय पुर्वापार चालत आलाय. मात्र सरकारने सगेसोयऱ्यांची अमंलबजावणी करू असं आश्वासन मनोज जरांगे पाटील यांना दिलं पण आता शिंदे गटाचे नेते आणि आमदारचं असं म्हणताय....
आरक्षणाच्या मुद्द्यावरून आजही भाजप आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. मनोज जरांगे पाटील हे मविआची भाषा बोलतात म्हणून भाजपने विरोधकांना टार्गेट केलं. तर सत्ताधारी आणि विरोधत सारेच विषय भरकटवत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. अशातच मराठा-ओबीसी आरक्षणाचे सरकारने दिलेले वायदे आता त्याचीच अडचण होऊन बसलेयी का? हा मुद्दा देखील सध्या चर्चेत आहे. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी असतील त्यांना आरक्षण द्यायला ना सत्ताधाऱ्यांचा विरोध आहे ना विरोधकांचा… हा निर्णय पुर्वापार चालत आलाय. मात्र सरकारने सगेसोयऱ्यांची अमंलबजावणी करू असं आश्वासन मनोज जरांगे पाटील यांना दिलं पण आता शिंदे गटाचे नेते आणि आमदारचं असं म्हणताय की, सगेसोयऱ्यांचं आश्वास सरकारने दिलंच नव्हत…त्यामुळे सरकारने दिलेल्या आश्वासनावर सरकारच्या तिनही पक्षांची भूमिका नेमकी काय? असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय.