Ashok Chavan | नितीन गडकरींचं नेहरुंबद्दलच म्हणणं भाजप आणि संघानं लक्षात घ्यायला हवं : अशोक चव्हाण
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते आहेत, असं मत व्यक्त केलंय. तसेच सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असं सर्वांनीच आत्मचिंतन करत जबाबदारीने वागलं पाहिजे असंही नमूद केलं.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते आहेत, असं मत व्यक्त केलंय. तसेच सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असं सर्वांनीच आत्मचिंतन करत जबाबदारीने वागलं पाहिजे असंही नमूद केलं. दिल्लीत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली ही मतं मांडली. नितीन गडकरी म्हणाले, “पंडीत जवाहरलाल नेहरु आणि अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते होते. दोघेही आम्ही आमच्या लोकशाही मर्यादांचं पालन करु असे म्हणत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कामाचा वारसा आमच्यासाठी प्रोत्साहनचा स्त्रोत आहे. जवाहरलाल नेहरु यांचंही भारतीय लोकशाहीत मोठं योगदान आहे.” यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, नितीन गडकरींचं नेहरुंबद्दलच म्हणणं भाजप आणि संघानं लक्षात घ्यायला हवं.