भाजप-ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा युती होणार? ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची लग्नसोहळ्यात भेट, काय झाला संवाद?
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार का? याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. यामागचं कारण ठरलंय का? लग्नात झालेली चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट. या भेटीत नेमकं काय झालं?
भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा युती होणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू झाली ती उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामधल्या भेटीमुळे. भाजप आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली. तिथे मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील आणि मिलिंद नार्वेकरांमध्ये एक मिश्कील संवाद झाला आहे. यावेळी मिलिंद नार्वेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना युती कधी होते असं सवाल केला. यावर चंद्रकांत पाटील यांनीही मिश्र उत्तर दिलंय. मी ही त्याच सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय असं चंद्रकांत पाटील म्हणाले. दोघांचा हा संवाद असतानाच उद्धव ठाकरे हे जवळच होते. ठाकरे काय कुजबुजताय असं विचारलं. यावर चंद्रकांत पाटीलांनी मी ही त्याच सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय असं म्हटलं. ही भेट लग्नातली असल्यामुळे गप्पा ही अनौपचारिक आणि मिश्किल स्वरूपाच्या होत्या असं भाजप नेत्यांनी म्हटलंय. मात्र संजय राऊतांनी चंद्रकांत पाटीलांची स्तुती करत आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं सांगितलंय. दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्यांनी एकमेकांवर सडकून टीका केली. पण फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरेंनी त्यांची विधानभवनात जात भेट घेतली. आदित्य ठाकरे ही काही कामांनिमित्त फडणवीसांना जाऊन भेटले त्यामुळे ठाकरे भाजपमधलं वितुष्ट कमी झाल्याची चर्चा होती. तर ठाकरे भाजपमधल्या युतीच्या चर्चांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. बघा नेमकं काय म्हटलंय?

पुणे प्रकरणात गावकऱ्यांकडून मिळाली मोठी माहिती, ‘आरोपी आला अन्..’

'... नाहीतर कपडे फाडून घरी पाठवू', राणेंनी काढली वडेट्टीवारांची लायकी

संजय शिरसाट यांची सिडको बस स्थानकात पाहाणी; कर्मचाऱ्यांना धरले धारेवर

डॉगस्कॉड अन् ड्रोन! बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पकडण्यास पोलिसांचा शोध
