Kolhapur Maratha Protest | मराठा आंदोलनाला भाजपचा पाठिंबा, चंद्रकांत पाटील देणार निवेदन
मराठा आंदोलनाला भाजपनेही पाठिंबा दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पाठिंब्याचं निवेदन संभाजीराजे छत्रपतींना देणार आहेत. तसेच, ते आज कोल्हापुरात मराठा मूक मोर्चातही सहभागी होणार आहेत.| BJP Announced To Support Maratha Andolan
मराठा आंदोलनाला भाजपनेही पाठिंबा दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पाठिंब्याचं निवेदन संभाजीराजे छत्रपतींना देणार आहेत. तसेच, ते आज कोल्हापुरात मराठा मूक मोर्चातही सहभागी होणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर, आता मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वात आज कोल्हापुरात मराठा मूक मोर्चाला सुरुवात होत आहे. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत. आजच्या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि मराठा नेते विनोद पाटील हेदेखील सहभागी होणार आहेत. | BJP Announced To Support Maratha Andolan Chandrakant Patil Will Join The Morcha
Latest Videos