जागावाटपापूर्वी भाजपकडून 20 उमेदवारांची यादी जाहीर, 'या' 4 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं

जागावाटपापूर्वी भाजपकडून 20 उमेदवारांची यादी जाहीर, ‘या’ 4 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं

| Updated on: Mar 14, 2024 | 10:32 AM

भाजपनं जागा वाटप होण्यापूर्वीच लोकसभेसाठी भाजपनं २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला असून पंकजा मुंडे यांना बीडमधून तर चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  

मुंबई, १४ मार्च २०२४ : भाजपनं जागा वाटप होण्यापूर्वीच लोकसभेसाठी भाजपनं २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या यादीत महाराष्ट्रातील तब्बल २० उमेदवारांची नावे आहेत. या यादीत काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर 4 विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे.नंदुरबार – हिना गावित, धुळे – सुभाष भामरे, जळगाव – स्मिता वाघ, रावेर – रक्षा खडसे, अकोला – अनूप धोत्रे, वर्धा – रामदास तडस, नागपूर – नितीन गडकरी, चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार, नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर, जालना – रावसाहेब दानवे, दिंडोरी – भारती पवार, भिंवडी – कपिल पाटील, उत्तर मुंबई – पियूष गोयल, मुंबई उत्तर पूर्व – मिहिर कोटेचा, पुणे – मुरलीधर मोहोळ, अहमदनगर – सुजय विखे पाटील, बीड – पंकजा मुंडे, लातूर – सुधाकर श्रृंगारे, माढा – रणजितसिंह निंबाळकर आणि सांगली – संजय काका पाटील यांना लोकसभेचं भाजपनं तिकीट दिलंय तर कुणाचा पत्ता कट केलाय बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Mar 14, 2024 10:32 AM