पंकजा मुंडेंचं अखेर भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी पण मंत्रीपद मिळणार का?
महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांची ही एमएलसी निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. थोडक्यात पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली असून पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपला आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांची ही एमएलसी निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. थोडक्यात पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली असून पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपला आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार का? अशा चर्चादेखील सुरु झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता पंकजा मुंडे सारखा ओबीसी चेहरा राज्यात भाजपसाठी लाभदायक ठरणार असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडेंना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेसाठी भाजपने पाच जणांची नावे जाहीर केली आहेत. पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे.