ठाकरे गट म्हणजे उष्ट्या पत्रावळीवरचे कावळे, भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
VIDEO | वास्को द गामाच्या काळात राऊत असते तर त्यांनाही सल्ला दिला असता. संजय राऊत यांना कुणी लगावला खोचक टोला
मुंबई : आजच्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर देशातील 20 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन करणार आहे. दरम्यान, संसद भवनाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षाचे नाव असते तर लोकशाहीची शोभा वाढली असती. पण आमच्या खासगी पंगतीत कोणी यायचे नाही. आला तर अपमान करू, असा संदेशच सरकारने दिला आहे. त्यामुळे जिथे राष्ट्रपतींनाच निमंत्रण नाही तिथे इतरांचे काय घेऊन बसलात? मिंधे-फडणवीस यांना अशा पंगतीत बसायला आवडेल. त्यामुळे त्यांनी जायला हरकत नाही. फक्त आडवाणी यांना एखादा कोपरा आहे का ते पाहा; असा खोचक टोला दैनिक सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून लगावल्याचे पाहायला मिळाले. यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. शेलार म्हणाले, ठाकरे गट म्हणजे उष्ट्या पत्रावळीवरचे कावळे, वास्को द गामाच्या काळात राऊत असते तर त्यांनाही सल्ला दिला असता. मात्र आम्ही उद्धवस्तांच्या माकडचाळ्यांना महत्त्व देणार नसल्याचे म्हणत शेलार यांनी राऊतांवर टीका केली आहे.