'विजय वडेट्टीवार आहे तरी कोण?', भाजपच्या बड्या नेत्याचा थेट सवाल

‘विजय वडेट्टीवार आहे तरी कोण?’, भाजपच्या बड्या नेत्याचा थेट सवाल

| Updated on: Sep 23, 2023 | 2:43 PM

VIDEO | राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शिवसेनेच्या अपात्र आमदारांच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लाईव्ह दाखवा, या मागणीवर भाजपच्या नेत्याची सडकून टीका अन् दिला खोचक सल्ला?

मुंबई, २३ सप्टेंबर २०२३ |शिवसेनेच्या अपात्र आमदारांची सुनावणी विधानसभा अध्यक्षांनी लाईव्ह दाखवा’, अशी मोठी मागणी राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या मागणीला संजय राऊत यांनी समर्थन दिलं तर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी यावर प्रत्युत्तर दिलं आहे. शेलार म्हणाले, ‘विजय वडेट्टीवार आहे तरी कोण? विजय वडेट्टीवार हे वकील आहेत का? की संविधानातील तज्ज्ञ आहेत, ते कोण आहेत?’ असा सवाल करत आशिष शेलार म्हणाले ते विरोधी पक्ष नेते आहेत. त्यामुळे त्यांनी तेवढ्यापुरतं विधान करणं योग्य आहे. मात्र सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना, या होणाऱ्या सुनावणीदरम्यान अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे सुनावणीमध्ये बिब्बा टाकण्याचा काम विजय वडेट्टीवार करत आहेत जे अत्यंत चुकीचे असल्याचा घणाघातही आशिष शेलार यांनी केला आहे. तर कायद्याचा थोडा अभ्यास करा आणि मग बोला, असा सल्लाही शेलार यांनी विजय वडेट्टीवार यांना दिलाय.

Published on: Sep 23, 2023 02:34 PM