'अयोध्येत राज ठाकरे यांचं स्वागत करणार पण...', काय म्हणाले बृजभूषण सिंह?

‘अयोध्येत राज ठाकरे यांचं स्वागत करणार पण…’, काय म्हणाले बृजभूषण सिंह?

| Updated on: Jan 15, 2023 | 1:26 PM

'अयोध्या नगरी सर्वांची आहे देशातील प्रत्येक नागरिकांची आहे. त्यामुळे राज ठाकरे आले तर त्यांना नक्की भेटेल. मी त्यांचे व्यक्तीगत स्वागत करणार पण...', नेमकं काय म्हणाले बृजभूषण सिंह

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने भाजप खासदार बृजभूषण सिंह पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या भव्य आयोजनाबद्दल कौतुक केले. यावेळी राज ठाकरे हे जर परत अयोध्येला आले तर तुम्ही त्यांचे स्वागत करणार का, असा प्रश्न बृजभूषण सिंह यांना विचारण्यात आला.

त्यावर बोलताना ते म्हणाले, अयोध्येत आले पाहिजे. अयोध्या नगरी सर्वांची आहे देशातील प्रत्येक नागरिकांची आहे. त्यामुळे राज ठाकरे आले तर त्यांना नक्की भेटेल. राज ठाकरे अयोध्येला आले तर मी व्यक्तीगत स्वागत करणार पण पक्षाची भूमिका काय असेल ते मला माहित नाही, असे ते म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, मी ज्यावेळी अयोध्येत राज ठाकरेंचा विरोध केला तेव्हा लोकांमध्ये अक्रोश होता.

दरम्यान, पुण्यात आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला बृजभूषण सिंह उपस्थित असतानाही राज ठाकरेंवर भाष्य केले होते. राज ठाकरेंशी माझे कोणतेही वैयक्तिक वाद नाही. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात कधीच दुरावा नव्हता. दोन्ही राज्यांचे एकमेकांवर प्रेम आहे. उत्तर प्रदेशातील असंख्य लोक महाराष्ट्रात येऊन आपली उपजीविका भागवतात. त्यामुळे माझा कधी महाराष्ट्राला विरोध नव्हताच असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

Published on: Jan 15, 2023 01:21 PM