माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; भाजप उमेदवार उज्ज्वल निकमांचं सूचक वक्तव्य

माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी…; भाजप उमेदवार उज्ज्वल निकमांचं सूचक वक्तव्य

| Updated on: May 05, 2024 | 5:24 PM

प्रसिद्ध वकील आणि भाजप लोकसभेचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी केले आहे. शहीद कामटे आणि करकरे यांना मारल्याची कबुली स्वतः दहशतवादी अजमल कसाब याने दिली, पण तुम्ही म्हणताय कसाबने त्यांना मारले नाही, कुठे फेडाल ही पाप? असा सवाल करत उज्ज्वल निकम यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय

माझ्याकडे असा दारूगोळा आहे पण मी तो बाहेर काढणार नाही, असं सूचक वक्तव्य प्रसिद्ध वकील आणि भाजप लोकसभेचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी केले आहे. शहीद कामटे आणि करकरे यांना मारल्याची कबुली स्वतः दहशतवादी अजमल कसाब याने दिली, पण तुम्ही म्हणताय कसाबने त्यांना मारले नाही, कुठे फेडाल ही पाप? असा सवाल करत उज्ज्वल निकम यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे तर पाकिस्तान तुमच्या अशा वक्तव्याचा किती वापर करू शकतो, याचा अंदाजही तुम्हाला नाही, असेही वक्तव्य करत विरोधकांवर उज्ज्वल निकम यांनी हल्ला चढवला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, ‘माझ्या येण्याने तुम्हाला मिरची झोंबली आहे, पण तुम्ही पाकिस्नाला मदत करताय हा संदेश गेला तर काय परिस्थीती होईल. इतके दिवस कुठे झोपला होतात, कोर्टात पुरावे द्यायचे ना… पाकिस्तान या वक्तव्याचा किती चुकीचा वापर करू शकतो, याची कल्पना आहे का? माझ्याकडे असा दारूगोळा आहे पण मी काढणार नाही…येणारा काळ तुम्हाला दाखवेल’, असंही निकम यांनी म्हटलंय.

Published on: May 05, 2024 03:51 PM