कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप उमेदवाराचा विजय, टीव्ही 9 मराठीवर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप उमेदवाराचा विजय झालाय. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा कोकण शिक्षक मतदारसंघात विजय झालाय. पाहा...
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप उमेदवाराचा विजय झालाय. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा कोकण शिक्षक मतदारसंघात विजय झालाय. विजयानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी टीव्ही 9 मराठीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा केवळ माझा विजय नसून सगळ्या शिक्षकांचा विजय आहे, असं ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणालेत. 33 शिक्षक संघटनांचा पाठिंबा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला. त्या विश्वासाची पूर्तता करता आली याचं समाधान आहे. मत देऊन विजयाच्या जवळ नेणाऱ्या माझ्या सगळ्या शिक्षक बांधवांचे मनापासून आभार. येत्या काळात चांगलं काम करायचंय. शिक्षकाच्या प्रश्नांना न्याय द्यायचा आहे, असं म्हात्रे म्हणाले.
Published on: Feb 02, 2023 12:33 PM