पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ

पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ

| Updated on: May 19, 2024 | 5:18 PM

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा कालच थंडावल्यात. अशातच कालच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची नक्कल केल्याचे पाहायला मिळाले.

देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात उद्या सोमवारी लोकसभेच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानाचा टप्पा पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा कालच थंडावल्यात. अशातच कालच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची नक्कल केल्याचे पाहायला मिळाले. उदयनराजे भोसले नेहमी आपल्या भाषणात बोलत असताना आपल्या शर्टाची कॉलर उडवताना दिसता. त्यांची ही स्टाईल राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आहे. यावरून पंकजा मुंडे यांनी उदयनराजे भोसलेंची नक्कल केली, यावेळी पंकजा मुंडेंनी आपल्याकडे कॉलर नसल्याचे म्हणत गमछा उडवल्याचे पाहायला मिळाले. बघा व्हिडीओ पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाले?

Published on: May 19, 2024 05:18 PM