कलम 370 हटवण्याला 2 वर्ष पूर्ण, काश्मिरमध्ये भाजपचा जल्लोष
काश्मिरमध्ये कलम 370 हटविण्याच्या निर्णयाला आज 2 वर्ष पूर्ण झालीयत. द्वितीय वर्षपूर्तीच्या निमित्ताने भाजपने आनंदोत्सव साजरा केला. भाजप कार्यालयात तिरंगा झेंडाही फडकविण्यात आला. कार्यककर्त्यांनी यावेळी भारत माता की जय, नरेंद्र मोदी झिंदाबाद, अमित शहा झिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
काश्मिरमध्ये कलम 370 हटविण्याच्या निर्णयाला आज 2 वर्ष पूर्ण झालीयत. द्वितीय वर्षपूर्तीच्या निमित्ताने भाजपने आनंदोत्सव साजरा केला. भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुग यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी नाचून गाऊन आजच्या दिवशी आनंद साजरा केला. भाजप कार्यालयात तिरंगा झेंडाही फडकविण्यात आला. कार्यककर्त्यांनी यावेळी भारत माता की जय, नरेंद्र मोदी झिंदाबाद, अमित शहा झिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या सरकारने दोन वर्षांपूर्वी खऱ्या अर्थाने कश्मीरला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणलं, असं तरुण चुग म्हणाले.
Latest Videos