‘कॉमन मॅन’ एकनाथ शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? उपमुख्यमंत्री होणार की पक्षाची धुरा सांभाळणार?
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री व्हायचं असेल तर उपमुख्यमंत्री नाहीतर शिंदे केंद्रातही मंत्री होऊ शकतात. शिंदे शिवसेनेचे अध्यक्ष अर्थात मुख्य नेते आहेत. त्यामुळे मुख्य नेत्यांच्या भूमिकेत राहून पक्षाचीच धुरा सांभाळणार की केंद्रीय मंत्रीपद स्वीकारून सत्तेत सहभागी होणार?
मुख्यमंत्रिपदावरून दावा सोडून एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराला पाठिंबा असेल, असं जाहीर केलं. यावरून भाजपचाच मुख्यमंत्री असेल हे निश्चित झालंय. मात्र या नंतर आता एकनाथ शिंदे कोणत्या भूमिकेत असतील, याची उत्सुकता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री व्हायचं असेल तर उपमुख्यमंत्री नाहीतर शिंदे केंद्रातही मंत्री होऊ शकतात. शिंदे शिवसेनेचे अध्यक्ष अर्थात मुख्य नेते आहेत. त्यामुळे मुख्य नेत्यांच्या भूमिकेत राहून पक्षाचीच धुरा सांभाळणार की केंद्रीय मंत्रीपद स्वीकारून सत्तेत सहभागी होणार? हे ही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिंदेंनी सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला तरी त्यांना उपमुख्यमंत्रीपदासह तगडं खातं मिळेल या शंका नाही. यापूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन वेळा नगरविकास सारख्या हेवी वेट सारख्या खात्याचे मंत्री राहिलेत. त्यामुळे तेच खातं त्यांना मिळू शकतं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट