चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ कधी मिळणार?
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या 'त्या' टीकेवर चंद्रकांत पाटील यांनी दिले प्रत्युत्तर, बघा काय केलं भाष्य
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची हिंदुत्वाची भूमिका मान्य नसल्याचे म्हटले होते. यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. हिंदुत्वाची भूमिका बाजूला ठेवून सावरकर कधी समजू शकणार नाहीत तर सावरकरांची सामाजिक भूमिका खूप मोठी होती ते विज्ञानवादी होती. मात्र या देशात स्वातंत्र्य मिळण्यासाठी, इंग्रजांविरोधी लढण्यासाठी क्रांतिकारकांना कोणी तयार केलं? तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी नाव न घेता सावरकर यांचे हिंदुत्त्व न मानणारे ढोंगी असल्याचा खोचक टोलाही विरोधकांना आणि स्वातंत्र्यवीरांवर टीका करणाऱ्यांना लगावला आहे. तर सरकार तुमचे आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न का दिला जात नाही, अशा संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ यावी लागते, त्यामुळे योग्य त्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न नक्की देण्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.