पंकजा मुंडे यांची बदनामी करण्यामागे भाजपचाच एक गट, चंद्रशेखर बावनकुळे यांचा धक्कादायक खुलासा

पंकजा मुंडे यांची बदनामी करण्यामागे भाजपचाच एक गट, चंद्रशेखर बावनकुळे यांचा धक्कादायक खुलासा

| Updated on: Jan 21, 2023 | 2:50 PM

पंकजा मुंडे भाजपात नाराज असल्याचे म्हटले जात होते. यामागे कोण आहे? असा सवाल सातत्याने भेडसावत असताना बावनकुळे यांनी केला धक्कादायक खुलासा

भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अशातच पकंजा मुंडे यांना शिवसेनेकडून पक्षात येण्याची ऑफर करण्यात आल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. दरम्यान, भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दावा फेटाळून लावला होता. मात्र तरीही पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याचे म्हटले जात होते. यामागे कोण आहे? असा सवाल सातत्याने भेडसावत असताना बावनकुळे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. या खुलासा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पक्षातील काही लोकचं पंकजा मुंडे आणि भाजपला बदनाम करत आहे. यामागे भाजपमधील एक युनिट असून तेच हे काम करत आहे. कोणीतरी हे जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करत आहे. अशी कबुली त्यांनी दिली आहे.बीडमधील कार्यक्रमात स्टेजवरील व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, पकंजा मुंडेंना सन्मानार्थ माझ्यानंतर बोलण्याचा मी आग्रह केला होता. कारण पकंजा मुंडे या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत तसेच त्या आमच्या राष्ट्रीय नेत्याही आहे. त्यामुळे त्यांचा अपमान झाला असे समजणे हे हास्यस्पद आहे.

Published on: Jan 21, 2023 02:50 PM