'... यावर काही बोलणार की मूग गिळून गप्प बसणार?', चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरे यांना थेट सवाल

‘… यावर काही बोलणार की मूग गिळून गप्प बसणार?’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरे यांना थेट सवाल

| Updated on: Mar 04, 2023 | 8:20 PM

VIDEO | औरंगजेबच्या फोटोवरून चंद्रशेखर बावनकुळे यांची गंभीर टीका, ट्वीट करत साधला निशाणा; बघा काय म्हणाले...

मुंबई : एमआयएचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध केला आहे. तर औरंगाबादच्या नामांतराचा विरोध करण्यासाठी त्यांनी आज उपोषण सुरु केलंय. जलील यांच्या आंदोलनात काही आंदोलकांनी थेट औरंगजेबाचा फोटो झळकावला. पण कुणीही त्यावर आक्षेप घेतला नाही. या प्रकाराबाबत भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला आहे. ‘छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM च्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकले. शिवरायांच्या पावन भूमीत औरंग्याचं समर्थन कशासाठी?, औरंग्याचं तुष्टीकरण करणाऱ्या प्रवृत्तीचा बीमोड करण्याची गरज आहे. यावर काही बोलणार की मूग गिळून गप्प बसणार? ‘, असं ट्वीट करत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट सवाल केलाय.

Published on: Mar 04, 2023 08:20 PM