संजय राऊत यांच्या ‘त्या’ सनसनाटी आरोपावर चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

संजय राऊत यांनी शेअर केलेल्या एका फोटोमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा वादळ येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र पेटलेला असताना हे महाशय मकाऊमध्ये जुगार खेळत आहेत असा गंभीर आरोपही केला आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय दिली पहिली प्रतिक्रिया, बघा...

संजय राऊत यांच्या 'त्या' सनसनाटी आरोपावर चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
| Updated on: Nov 20, 2023 | 3:52 PM

मुंबई, २० नोव्हेंबर २०२३ : खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा चीनमधील मकाऊ येथे असणाऱ्या कॅसिनोमधील एक फोटो शेअर केला आणि त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटले की, महाराष्ट्र पेटलेला असताना हे महाशय मकाऊमध्ये जुगार खेळत आहेत असा गंभीर आरोप करत फोटो झुम करून बघा हे तेच महाशय आहेत ना? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. तर एका रात्रीत त्यांनी 3.50 कोटी रुपये कॅसिनो जुगारात उडवले असा गंभीर आरोपही केला. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो असल्याचेही त्यांनी म्हटले.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.