'मागच्या दाराने विधानपरिषदेवर गेले आणि...', चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

‘मागच्या दाराने विधानपरिषदेवर गेले आणि…’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

| Updated on: Mar 27, 2023 | 3:33 PM

VIDEO | आडनावावरून उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत हल्लाबोल केल्यानतंर चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रत्युत्तर

नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे नेहमी माझ्या कुळाचा उल्लेख करतात. आमचा बावनकुळे कूळ हिंदुत्ववादी आहे. पण तुम्ही तुमचा कूळ बुडविला आहे, अशी घणाघाती टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. बावनकुळे यांच्या आडनावावरून उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत टीका केली. ५२ काय १५२ कुळे खाली उतरली तरी शिवसेना बुडवू शकणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी आजवर एकही निवडणूक लढली नाही, यावरून बावनकुळे यांनी त्यांच्यावर टीका केली. जे उद्धव ठाकरे कधी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढले नाही.. मागच्या दारावरून विधानपरिषद गेलेले उद्धव ठाकरे कशाला निवडणूक घेण्याची गोष्ट करतात.. ज्यांना निवडणूक लढण्याची सवय नाही.. त्यांनी निवडणूकीच्या गप्पा मारू नये.. जेव्हा केव्हा निवडणूक होईल आम्ही विधानसभेतील 200 जागा जिंकून येऊ, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Mar 27, 2023 03:33 PM