शरद पवार यांना आलेल्या धमकीवर चंद्रशेखर बानवकुळे यांचं भाष्य; म्हणाले, ‘देवेंद्रजी सक्षम…’
VIDEO | शरद पवार यांना आलेल्या धमकीवर चंद्रशेखर बानवकुळे यांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. ट्विटरवरून अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांना जीवे मारण्याची ही धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सौरभ पिंपळकर या नावाच्या ट्विटर हँडलवरून शरद पवार यांना ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली आहे. यानंतर राजकीय नेत्यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या धमकी प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘शरद पवार यांना ज्यानं धमकी दिली असेल त्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, त्याला जेलमध्ये टाकले पाहिजे. शरद पवार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला धमकी देणं योग्य नाही. अशी धमकी दिली असले त्यावर कारवाई करायला देवेंद्र फडणवीस, आमचं सरकारही सक्षम आहेत. तो कोणत्याही पक्षाचा असो कारवाई होईल’