छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर भाजपचा दावा, कसं असणार भाजपचं मिशन लोकसभा?
VIDEO | छत्रपती संभाजीनगर येथील लोकसभेची जागा भाजपला मिळावी, काय केला दावा? लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्यव्यापी दौरा, कसा असणार दौरा आणि कसं असणार भाजपचं मिशन लोकसभा? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, १८ ऑगस्ट २०२३ | छत्रपती संभाजी नगर येथील लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केलाय. भागवत कराड यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असे म्हटले. तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची तयारी केली आहे. यासह उद्धव ठाकरे यांनी देखील सर लोकसभेच्या ४८ जागांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. आधी कल्याणच्या जागेवर भाजप आमदारांनी दावा केलाय. त्यानंतर आता छत्रपती संभाजी नगर येथील लोकसभेच्या जागेवर भाजपने मागणी केलीये. इतकच नाही तर त्या जागेवर भाजपने थेट दावाच सांगितला आहे. शिवसेनेची ताकद कमी झाल्याने ही जागा भाजपला मिळाली असं भागवत कराड यांनी म्हटलंय. तर त्यांनी ती जागा लढवण्याची तयारीही दर्शविली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यव्यापी दौरा करणार आहेत. कसा असणार दौरा आणि कसं असणार भाजपचं मिशन लोकसभा? बघा स्पेशल रिपोर्ट