Chitra Wagh Video : बिग बॉसचा सीझन आठवला, रोहिणी खडसेंच्या खोचक टीकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार, स्पष्टच म्हणाल्या…
चित्रा वाघ यांच्या सभागृहातील रौद्ररूपावरून विरोधक त्यांच्यावर निशाणा साधताय. अशातच पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर खोचक निशाणा साधलाय
दिशा सालियन हत्या प्रकरणावरून काल सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अनिल परबांवर टीका करताना चित्रा वाघ या चांगल्याच भडकल्या असताना त्यांनी अनिल परबांवर सडकून टीका केली. यावरूनच शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला. रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर खोचक टीका करता ट्वीटवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधताना ‘बाईईईईई काय हा प्रकार… थोडं थोडं साम्याच आहे, नाही ! पण कोणीतरी सांगा ते आपल्या राज्याचे ते सर्वोच्च सभागृह आहे.. बिग बॉसचा एखादा सीजन नाही!!’, असं म्हटलं होतं. दरम्यान, या ट्वीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा चित्रा वाघ यांच्यावर घणाघात केल्याचे पाहायला मिळाले. हे राज्याचं सभागृह आहे. बिग बॉसचा सीझन नाही. जी काल वक्तव्य करण्यात आलं ती पाहून मला बिग बॉसचा सीझन आठवला. त्या कार्यक्रमात तुम्ही जितकी एकमेकांची उनी-धुणी काढाल तेवढाच बिग बॉस खूश होतो. तसंच वक्तव्य चित्रा वाघ यांनी कोणाला तरी खूश कऱण्यासाठी केलं होतं का? असा सवाल रोहिणी खडसेंनी केला. यावर चित्रा वाघ यांनी स्पष्ट शब्दात प्रत्युत्तर दिलं. ‘रोहिणी खडसे यांचे वडील विधान परिषदेत माझ्या समोर बसतात. त्यांनी त्यांना विचारावं, ते जास्त चांगलं सांगतील’, असं म्हणत चित्रा वाघ यांनी रोहिणी खडसेंनी केलेल्या टीकेनंतर भाष्य केले आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
