लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
भाजप, काँग्रेस आणि ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळे १६ लढती निश्चित झाल्यात. आतापर्यंत महाराष्ट्रात १६ मतदारसंघात लढती निश्चित झाल्यात. बघा इतर ठिकाणी कोण कोणाविरूद्ध लढणार?
भाजप, काँग्रेस आणि ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळे १६ लढती निश्चित झाल्यात. आतापर्यंत महाराष्ट्रात १६ मतदारसंघात लढती निश्चित झाल्यात. सांगलीतून संजय काका पाटील विरूद्ध चंद्रहार पाटील, उत्तर पूर्व मुंबईतून मिहीर कोटेचा विरूद्ध संजय दिना पाटील, नागपुरातून नितीन गडकरी विरूद्ध विकास ठाकरे, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार विरूद्ध प्रतिभा धानोरकर, गडचिरोली-चिमूरमधून अशोक नेते विरूद्ध नामदेव किरसान, भंडारा-गोंदियात सुनिल मेंढे विरूद्ध प्रशांत पडोळे, राम सातपुते विरूद्ध प्रणिती शिंदे, पुण्यात मुरलीधर विरूद्ध रवींद्र धंगेकर, नांदेडमधून प्रातपराव चिखलीकर विरूद्ध वसंतराव चव्हाण, लातूरमधून सुधारकर श्रृंगारे विरूद्ध शिवाजीराव काळगे, नंदूरबारमधून डॉ. हिना गावित विरूद्ध गोवाल पाडवी, अमरावतीत नवनीत राणा विरूद्ध बळवंत वानखेडे यांच्यात लोकसभेचा सामना रंगणार आहे. बघा इतर ठिकाणी कोण कोणाविरूद्ध लढणार?