'उठा उठा निवडणूक आली, ढोंगी हिंदुत्वाची...', भाजपनं उद्धव ठाकरेंना डिवचलं

‘उठा उठा निवडणूक आली, ढोंगी हिंदुत्वाची…’, भाजपनं उद्धव ठाकरेंना डिवचलं

| Updated on: Apr 03, 2024 | 1:14 PM

निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास एककीडे सुरूवात झाली आहे तर दुसरीकडे प्रत्येक आरोपावर सत्ताधारी विरोधक प्रत्युत्तर देतांना दिसताय. अशातच भाजपने ट्वीटकरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. नेमकी काय केली बोचरी टीका?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे दिसंतय. लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहे. सगळीकडे अर्ज भरण्याची लगबग आहे. तर काहीचे अद्याप उमेदवारही ठरले नाहीत. त्यामुळे त्यांची उत्सुकताही आहे. दरम्यान, निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास एककीडे सुरूवात झाली आहे तर दुसरीकडे प्रत्येक आरोपावर सत्ताधारी विरोधक प्रत्युत्तर देतांना दिसताय. अशातच भाजपने ट्वीटकरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेहमीच शाब्दित चकमक पाहायला मिळते. अशातच भाजपकडून उद्धव ठाकरे यांना डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. ‘उठा उठा निवडणूक आली, ढोंगी हिंदुत्वाची चादर ओढण्याची वेळ आली.’, असं भाजपनं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. भाजपने आपल्या सोशल मीडियावर हँडलवरून ही टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

Published on: Apr 03, 2024 01:10 PM