तिकीट कापल्यानं भाजपचे उन्मेष पाटील ठाकरे गटाकडून लोकसभा लढणार?
तिकीट कापल्यानं नाराज भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटाकडून लोकसभा लढणार असल्याची चर्चा आहे. इतकंच नाहीतर ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. मातोश्रीवर भेट घेऊन त्यांनी आपल्या लोकसभेचं तिकीटही केलं निश्चित?
भाजपमध्ये नेत्याचं इनकमिंग सुरू असताना भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचे पाहायला मिळतंय. तिकीट कापल्यानं नाराज भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटाकडून लोकसभा लढणार असल्याची चर्चा आहे. इतकंच नाहीतर ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. मातोश्रीवर भेट घेऊन त्यांनी आपल्या लोकसभेचं तिकीटही निश्चित केल्याचे समजतंय. उन्मेष पाटील यांनी सामना कार्यालयात संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीस गेले. उन्मेष पाटील हे आज दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. तर त्यांच्यासोबत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार सुद्धा ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. २०१९ मध्ये उन्मेष पाटील हे तब्बल ४ लाख मतांनी विजयी झाले होते. मात्र यावेळी त्यांचं तिकीट भाजपने कापून विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ते नाराज असल्याचे सांगितले जातंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…