नारायण राणे यांचा पत्ता कट, भाजपकडून ‘या’ नेत्यांना राज्यसभेची संधी, कुणाला उमेदवारी जाहीर?

नारायण राणे यांचा पत्ता कट, भाजपकडून ‘या’ नेत्यांना राज्यसभेची संधी, कुणाला उमेदवारी जाहीर?

| Updated on: Feb 14, 2024 | 3:10 PM

राज्यसभेकरता भाजपने तीन उमेदवार निश्चित केले आहे. यामध्ये नुकतेच भाजपात दाखल झालेल्या अशोक चव्हाण यांच्यासह भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि विदर्भातील भाजपचे जुने कार्यकर्ते अजित गोपछडे यांनी राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

मुंबई, १४ फेब्रुवारी २०२४ : भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीकरता उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राज्यसभेकरता भाजपने तीन उमेदवार निश्चित केले आहे. यामध्ये नुकतेच भाजपात दाखल झालेल्या अशोक चव्हाण यांच्यासह भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि विदर्भातील भाजपचे जुने कार्यकर्ते अजित गोपछडे यांनी राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की, अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केला तर त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात येईल आणि त्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. राज्यसभेच्या एकूण ६ जागा या महायुतीकडे आहेत. त्यापैकी चार जागा या भाजपकडून देण्यात येणार आहे. त्यापैकी तीन जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. तर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं नारायण राणेंचा पत्ता कट करण्यात आल्याचे म्हटलं जात आहे.

Published on: Feb 14, 2024 03:02 PM