महायुतीला हानी, अजितदादा पराभवाचे धनी? सोबत आलेले चुकले की सोबत घेणारे चुकले?
२०२३ ला आवडते अजित पवार आकडे उलटे झाल्यानंतर नावडते झालेत का? असा सवालही केला जात आहे. २०१९ ला मत विभाजनामुळे फायद्यात ठरलेली नांदेडची जागा अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने सुरक्षित करण्याचा प्रयत्न झाला. मात्र तिथेही चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश नांदेडकरांना रूचला नाही...
महाराष्ट्रात महायुती विशेष करून भाजपच्या पराभवाचं खापर आधी संघाच्या मुखपत्रातून अप्रत्यभपणे अजित पवार यांच्यावर फोडलं गेलं. त्यानंतर पुन्हा संघ-भाजप यांच्यासह शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा महायुतीला अजित पवार यांचा काय फायदा झाला? याबद्दल तक्रारी सुरू केल्याची चर्चा आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचा पुरस्कार करत ज्या भाजपने त्यांना ८ महिन्यापूर्वी सत्तेत प्रवेश दिला, त्याच भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे तिरस्काराचा सूर दिसत असल्याची माहिती आहे. २०२३ ला आवडते अजित पवार आकडे उलटे झाल्यानंतर नावडते झालेत का? असा सवालही केला जात आहे. २०१९ ला मत विभाजनामुळे फायद्यात ठरलेली नांदेडची जागा अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने सुरक्षित करण्याचा प्रयत्न झाला. मात्र तिथेही चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश नांदेडकरांना रूचला नाही… अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांना सोबत घेणारे चुकले? की सोबत आलेले चुकले?