खडसेंनी वयाचं भाव ठेवावं, भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला जोरदार पलटवार?

खडसेंनी वयाचं भाव ठेवावं, भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला जोरदार पलटवार?

| Updated on: Mar 19, 2024 | 1:02 PM

भाजपचे कणखर नेतृत्व असलेले एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये गेल्यावर ते सातत्याने भाजपवर हल्ला चढवताना पाहायला मिळत आहे. अशातच एकनाथ खडसेंना भाजप जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर यांनी थेट उत्तर दिले आहे.

जळगाव, १९ मार्च २०२४ : जळगाव जिल्ह्यात भाजपला कुत्र विचारत नव्हतं, त्यावेळी मी राजकारणात भाजपला जिल्ह्यात मजबूत केले, असे वक्तव्य काल एकनाथ खडसे यांनी केले होते. खडसे यांच्या या वक्तव्यावरून भाजप जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर यांनी एकनाथ खडसे यांच्यावर पलटवार करत जोरदार हल्लाबोल केलाय. भाजपचे कणखर नेतृत्व असलेले एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये गेल्यावर ते सातत्याने भाजपवर हल्ला चढवताना पाहायला मिळत आहे. अशातच एकनाथ खडसेंना भाजप जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर यांनी थेट उत्तर दिले आहे. ‘ज्या भाजप विषयी तुम्ही बोलतात त्याच भाजपने तुम्हाला बारा खात्याचे मंत्री केले. भाजपने तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद दिले. भाजपने तुमच्या मुलीला जिल्हा बँकेचा अध्यक्षपद दिले. भाजपनेच तुमच्या पत्नीला जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष पद दिले. एवढा असतानाही तुम्ही भाजपला कुत्रही विचारात नव्हता, असे म्हणत असाल तर याच म्हणण्याप्रमाणे आज तुमची परिस्थिती झाली आहे. या शब्दात ज्ञानेश्वर जळकेकर यांनी खडसेवर निशाणा साधला आहे.

Published on: Mar 19, 2024 01:02 PM