Chiplun Flood नंतरच्या स्वच्छतेसाठी केंद्र सरकारने 2 कोटी दिले | Pramod Jathar

| Updated on: Jul 31, 2021 | 6:57 PM

राज्य शासनाच्या आधी आम्ही केंद्रामार्फत दोन कोटी आणलेत. येत्या आठ दिवसात चिपळूण स्वच्छ करून घ्या येणाऱ्या काही दिवसात याहीपेक्षा जास्त निधी आणू, असे जठार पुढे म्हणाले.

चिपळूण : चिपळूणमध्ये आलेल्या पूरग्रस्तांना मदत म्हणून केंद्राने तातडीचे दोन कोटी पाठवले आहेत. ते दोन कोटी तातडीचे वापरा यासाठी एकदा नगरसेवक विरोध करत असेल तर मी स्वतः त्याला समजावेन. मात्र चिपळूणकरांच्या मदतीसाठी ते पाठवलेले दोन कोटी ते जर तुम्ही आता वापरले नाहीत तर हेच चिपळूणकर तुमच्यावर केस केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा टोला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिला. नगरपरिषद आमची आहे. राज्य शासनाच्या आधी आम्ही केंद्रामार्फत दोन कोटी आणलेत. येत्या आठ दिवसात चिपळूण स्वच्छ करून घ्या येणाऱ्या काही दिवसात याहीपेक्षा जास्त निधी आणू, असे जठार पुढे म्हणाले.