कोकणात मविआला धक्का, भाजपचे म्हात्रे विजयी; यासह जाणून घ्या मोठ्या घडामोडी
विधानपरिषदेच्या तीन जागांवर महाविकासआघाडीची आघाडी झाली आहे, तर नागपूर आणि औरंगाबादमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. कोकणात भाजपचा झे़ंडा तर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराचा विजय
मुंबई : विधानपरिषदेच्या तीन जागांवर महाविकासआघाडीची आघाडी झाली आहे, तर नागपूर आणि औरंगाबादमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. कोकणात भाजपचा झे़ंडा तर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. अमरावतीत फेरमोजणीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर तर भाजपच्या डॉ. रणजीत पाटील हे पिछाडीवर असून पाटील यांच्या मागणीनंतर ही फेरमोजणी करण्यात आली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा दणदणीत विजय झाला आहे. तर मविआच्या शुभांगी पाटील यांचा पराभव झाला आहे. तर नागपुरात महाविकास आघाडीच्या सुधाकर अडबालेंचा विजय झाला आहे तर ना. गो. गाणार यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. मराठवाड्यात राष्ट्रवादीने गड राखला असून औरंगाबादमध्ये मविआच्या विक्रम काळे यांनी चौथ्यांदा उधळता विजयाचा गुलाल तर भाजपच्या किरण पाटील यांचा पराभव झाला आहे. कोकणात शिक्षक पदवीधर मतदार संघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी तर मविआला मोठा धक्का तर शेकापच्या बाळाराम पाटील यांचा पराभव झाला आहे.