आम्हीच बारामती जिंकणार, चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास; बारामतीत ताईंविरोधात अजितदादा करणार प्रचार?
tv9 marathi Special report | मिशन बारामतीकडे भाजपनं पुन्हा लक्ष केंद्रीत केल्याचे पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभेची जागा मोठ्या फरकानं जिंकणार असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत. तर महायुतीचा उमेदवार म्हणून अजित पवार, सुप्रिया सुळेंविरोधात प्रचार करणार?
मुंबई, १४ ऑक्टोबर २०२३ | मिशन बारामतीकडे भाजपनं पुन्हा लक्ष केंद्रीत केलंय. बारामती लोकसभेची जागा मोठ्या फरकानं जिंकणार असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत. तर महायुतीचा उमेदवार म्हणून अजित पवार, सुप्रिया सुळेंविरोधात प्रचार करणार असं दादांचे मंत्री हसन मुश्रीफ म्हणालेत. सुप्रिया सुळेंनी येत्या लोकसभा निवडणुकीत आपणच पुन्हा बारामतीतून लढणार, हे स्पष्ट केलंय. मात्र आम्हीच बारामती जिंकणार आणि मोठ्या फरकानं जिंकू असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला. म्हणजेच भाजपकडून बावनकुळेंनी स्पष्ट संकेत दिलेत की, बारामतीतून भाजपचा उमेदवार असेल. दरम्यान आढावा बैठकीत, बारामतीत सुप्रिया सुळेंना मदत करा अशा सूचना उद्धव ठाकरेंना पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यामुळं उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना बारामती आम्हीच जिंकू असं बावनकुळे म्हणालेत. बावनकुळेंचा आत्मविश्वास वाढण्याचं कारण म्हणजे, भाजपसोबत सत्तेत आलेले अजित पवार. दादांमुळं बारामती लोकसभा जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होईल असं भाजपला वाटतंय. पण काय होणार हे आगामी निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल.