‘तुला बघून घेतो, माझ्याकडे बंदूक…’, माजी आमदाराच्या मुलाची धमकी, सरकारी अधिकारीही भिडला, क्लीप व्हायरल
पाथरीचे माजी आमदार यांचा मुलगा गोविंद वडीकर आणि कालवा निरीक्षक कृष्णा आकात यांच्यातही फोनवरून वाद झाल्याचा ऑडिओ क्लिप द्वारे समोर आला आहे.
जायकवाडी धरणाच्या कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्यात आलेले आहे. असे असताना शेतकरी आणि पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद होताना दिसताय. वरखेडवरून वडीला जाणाऱ्या कालव्याचं पाणी बंद केलेने पाथरीचे माजी आमदार यांचा मुलगा गोविंद वडीकर आणि कालवा निरीक्षक कृष्णा आकात यांच्यात फोनवरून वाद झाला. यावेळी गोविंद वडीकर याने कालवा निरीक्षक कृष्णा आकात यांना धमकी दिली ही ऑडिओ क्लिप व्हायरल होतेय.
या ऑडिओ क्लिपची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही. दोघांच्या फोनवर झालेल्या संभाषणातील एक ऑडियो सध्या व्हायरल होत असून ज्यात गोविंद वडीकर यांच्याकडून बंद केलेलं पाणी पुन्हा सोडण्यासाठी कालवा निरीक्षक कृष्णा आकात यांना धमकावण्यात आल्याचे ऐकायला मिळत आहे. तुम्ही पाणी बंदच कसे केले शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यामुळे होत आहे. तुम्हाला बघून घेईल…
गोविंद वडीकर यांनी कालवा निरीक्षक कृष्णा आकात यांना फोन केला होता. यावेळी त्यांनी म्हटले की, मी माझी आमदार वडीकर साहेबांचा मुलगा बोलताय संभाजीनगरवरुन. तुम्ही ते 54 चारीचं पाणी बंद केलं, तिकडे आमचा 10-12 एक ऊस आहे, तो जळून चाललाय. त्यावर कृष्णा आकात यांनी सांगितले की, 54 चारी नेहमी चालू असल्यामुळे सगळ्या चाऱ्यांमध्ये मुरुम टाकलाय आपण… असं उत्तर देण्यात आल्याचे ऐकायला मिळंतय. ऐका नेमकं काय झालं बोलणं?

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप

कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
