‘आधी शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा…’, भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य
साई संस्थानच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करा... असे म्हणत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी साई संस्थान प्रशासनाकडे मागणी केली आहे.
साई संस्थानच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करा… असे म्हणत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी साई संस्थान प्रशासनाकडे मागणी केली आहे. इतकंच नाहीतर ते पुढे असेही म्हणाले की, जे पैसे अन्नदानात जातात त्या पैशांचा वापर आमच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करावा, अशी मागणीही त्यांनी केली. ‘अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय , महाराष्ट्रातील सगळे भिकारी इथे गोळा झालेत.. हे योग्य नाही. आम्हाला आंदोलनाची वेळ आली तरी चालेल आम्ही आंदोलन करू’, असं वक्तव्य करत सुजय विखे पाटील यांनी साई संस्थानला इशारा दिला आहे. शिर्डीत कोट्यवधी रुपये खर्च करून शैक्षणिक संकुल उभारण्यात आलय मात्र चांगले शिक्षक तेथे नाही. इंग्लिश विषय शिकवणाऱ्यालाच इंग्रजी येत नाही. इंग्लिश विषयाचा शिक्षक मराठीत इंग्लिश शिकवतोय याचा काय उपयोग? असा सवाल करत सुजय विखे पाटील यांनी साई संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील शिक्षकांवर ताशेरे ओढल्याचे पाहायला मिळाले. शिर्डीतील शिर्डी परिक्रमा उद्धोषणा कार्यक्रमात सुजय विखे पाटील यांनी हे वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, भोजनालयात जेवणासाठी दर आकारावे याची मागणी सुजय विखे पाटील यांनी केली. अन्यथा आंदोलनाची वेळ आली तरी आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला.