Cabinet Expansion 2024 : सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Cabinet Expansion 2024 : सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

| Updated on: Dec 15, 2024 | 5:17 PM

भारतीय जनता पक्षाच्या गणेश नाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गणेश नाईक हे १९९५ पासून सलग ७ वेळा आमदार राहिले आहेत. यावेळी त्यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे.

महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज नागपूरमध्ये होत आहेत. आज नागपूरच्या राजभवनात महायुतीमधील एकूण ३९ नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्यात सर्वात पहिल्यांदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथ घेतल्याचे पाहायला मिळाले. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या गणेश नाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गणेश नाईक हे १९९५ पासून सलग ७ वेळा आमदार राहिले आहेत. यावेळी त्यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे. नवी मुंबईतील गणेश नाईक यांची भारतीय जनता पक्षाचे ताकदवान नेते अशी ओळख आहे. नवी मुंबईत गेणेश नाईक यांचं मोठं राजकीय वर्चस्व असल्याचे पाहायला मिळते. हे वर्चस्व आणि कामगिरी पाहता पक्षाने त्यांना यावेळी मंत्रिपदाची संधी दिली आहे. गणेश नाईक हे भाजपमध्ये येण्यापूर्वी ते शिवसेना, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. तर २०१९ मध्ये गणेश नाईक यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून ही शपथ ग्रहण केल्यानंतर गणेश नाईक यांना कोणतं खातं मिळतं? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

Published on: Dec 15, 2024 05:14 PM