Prashant Bamb यांचा 'त्या' व्हायरल होणाऱ्या क्लिपबाबत खुलासा; म्हणाले, 'तर आमदारकीचा राजीनामा देणार'

Prashant Bamb यांचा ‘त्या’ व्हायरल होणाऱ्या क्लिपबाबत खुलासा; म्हणाले, ‘तर आमदारकीचा राजीनामा देणार’

| Updated on: Aug 31, 2023 | 4:55 PM

VIDEO | भारतीय जनता पार्टीचे गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब पुन्हा एकदा सापडले वादाच्या भोवऱ्यात, व्हायरल व्हिडीओवर प्रशांत बंब यांनी दिले आपले स्पष्टीकरण नेमकं काय म्हणाले बघा...

औरंगाबाद, ३० ऑगस्ट २०२३ | भाजप आमदार प्रशांत बंब हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. प्रशांत बंब यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात एका माजी उपसरपंचाने प्रशांत बंब यांना प्रश्न विचारला त्यावरून प्रशांत बाब आणि उपसरपंच यांच्यात खडाजंगी झाली तर दुसरीकडे एका शाळेतील शिक्षकेला प्रशांत बंब यांनी खडेबोल सुनावले या दोन्हीही क्लिप सध्या समाज माध्यमातून व्हायरल होत आहेत. भारतीय जनता पार्टीचे गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब गेल्या अनेक दिवसांपासून प्रशांत बंब यांनी शिक्षकांचे विरोधात मोर्चा काढला आहे. त्यामुळे प्रशांत बंब हे चर्चेत आहेत. तर प्रशांत बंब पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे पुन्हा एकदा शालेय सुधारणा आणि जनता दरबार कारणीभूत आहेत. प्रशांत बंब दोन दिवसापूर्वी त्यांच्याच मतदारसंघातील जोगेश्वरी गावात जनता दरबारासाठी गेले होते, या जनता दरबारात एका उपसरपंचाने त्यांना तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध करता असा सवाल विचारला असता त्यावर प्रशांत बंब यांनी समोरच्या कार्यकर्त्याला तुला काही माहिती नाही तू शांत बस असं बोलल्यावरून खडाजंगी झाली आणि ती क्लिप समाज माध्यमातून व्हायरल झाली. या व्हायरल व्हिडीओवर प्रशांत बंब यांनी आपले स्पष्टीकरण दिले. बघा काय म्हणाले…

Published on: Aug 30, 2023 06:16 PM