भाजप सरचिटणीसचा शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
त्यामुळे महापालिकेच्या निवडणुक अधिक चुरशीची होईल असं वाटतंय कारण जयंत पाटील यांनी सोलापूर दौरा केल्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते अधिक सजग झाल्याचं चित्र सोलापूरमध्ये पाहायला मिळालं आहे. तसेच भाजपाचे सरचिटणीसांचा शेक़डो समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. भाजपचे सरचिटणीस बिज्जू प्रधानेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश
सोलापूर (solapur) महापालिकेची निवडणुक तोंडावर असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) सोलापूर दौ-यावर आहेत, पालिका निवडणुकीच्या तोंडावर ते अनेक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना सगळे मतभेद विसरून कामाला लागा असा मॅसेज देखील त्यांच्या स्टाईलमध्ये (style) कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे त्यांच्या मर्जीतील अनेक नेते त्यांच्यासोबत असून महापालिकेतील निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका सुरू आहेत. सोलापूरातील एका मेळाव्यात नाराज असलेले भगीरथ भालके (bhagirath bhalake) यांनी सुध्दा सगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर ग्वाही दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुक अधिक चुरशीची होईल असं वाटतंय कारण जयंत पाटील यांनी सोलापूर दौरा केल्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते अधिक सजग झाल्याचं चित्र सोलापूरमध्ये पाहायला मिळालं आहे. तसेच भाजपाचे सरचिटणीसांचा शेक़डो समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. भाजपचे सरचिटणीस बिज्जू प्रधानेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश