किरीट सोमय्या पुन्हा सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षानं दिली मोठी जबाबदारी

किरीट सोमय्या पुन्हा सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षानं दिली मोठी जबाबदारी

| Updated on: Sep 10, 2024 | 1:36 PM

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली समिती जाहीर करण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांना पुन्हा पक्षाचं काम देण्यात आलं आहे. ‘निवडणूक संपर्क प्रमुख’ म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी असणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसात जाहीर होणार आहे. त्यापूर्वी पक्षांकडून राजकीय नेत्यांवर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी देण्यात येत आहे. अशातच किरीट सोमय्यांवर पुन्हा एकदा पक्षांतर्गत कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्यांवर पक्षाकडून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपने ‘विधानसभा निवडणूक संपर्क प्रमुख’पदी किरीट सोमय्या यांची निवड केली आहे. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांवर सोमय्यांनी आरोप केले होते. त्यातीलच काही नेते महायुती सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्यावर पत्राद्वारे ‘निवडणूक संपर्क प्रमुख’ पदाची जबाबदारी पक्षाकडून सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर किरीट सोमय्या पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

Published on: Sep 10, 2024 01:36 PM