शिवसेनेचा घरपोहोच वाईन विक्रीचा प्रस्ताव भाजपाने फेटाळला होता; बावनकुळेंचा गौप्यस्फोट
भाजप सेना युतीचे सरकार होते, त्यावेळी शिवसेनेने घरपोहोच वाईन विक्रीचा प्रस्ताव मांडला होता. मात्र दारू शरीराला हाणीकारणक असल्यामुळे तेव्हा आम्ही हा प्रस्ताव फेटाळल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये किराणा दुकानात तसेच शॉपिंग मॉलमध्ये वाईन विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. यातच आता भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप सेना युतीचे सरकार होते, त्यावेळी शिवसेनेने घरपोहोच वाईन विक्रीचा प्रस्ताव मांडला होता. मात्र दारू शरीराला हाणीकारणक असल्यामुळे तेव्हा आम्ही हा प्रस्ताव फेटाळल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
Latest Videos