महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या शिवसेनेच्या 10 उमेदवारांची यादी तयार फक्त घोषणा बाकी

महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या शिवसेनेच्या 10 उमेदवारांची यादी तयार फक्त घोषणा बाकी

| Updated on: Mar 19, 2024 | 10:57 AM

भाजपने पहिल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली. आता उर्वरित भाजपच्या कोट्यातील जागेकरता अजित पवार गट आणि शिंदे गट यांना देण्यात येणाऱ्या जागांवर चर्चा होणार आहे. शिंदे गटाकडून १० उमेदवारांची यादी तयार असून फक्त घोषणा बाकी असल्याची चर्चा

मुंबई, १९ मार्च २०२४ : महायुतीच्या जागावाटपावरून अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी भाजपची कोअर कमिटी दिल्लीत दाखल झाली. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे हे दिल्लीला रवाना झाले होते. या बैठकीमध्ये अजित पवार यांचा गट आणि शिंदे गट यांना किती जागा मिळणार हे निश्चित होण्याची शक्यता आहे. अशातच शिंदे गटाकडून १० उमेदवारांची यादी तयार असल्याची माहिती मिळतेय. भाजपने पहिल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली. आता उर्वरित भाजपच्या कोट्यातील जागेकरता अजित पवार गट आणि शिंदे गट यांना देण्यात येणाऱ्या जागांवर चर्चा होणार आहे. शिंदे गटाकडून १० उमेदवारांची यादी तयार असून फक्त घोषणा बाकी असल्याची चर्चा आहे. तर लोकसभेकरता होणारं जागा वाटप हे सन्मानजनक होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. जागावाटप समन्वयाने आणि सन्मानजनक होईल. महायुतीत कुठलाही विवाद नाही. काही चिंता करु नका. योग्यवेळी निर्णय होईल. या राज्यात 45 पारचा आकडा महायुतीचा येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात मजबुत होतील, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

Published on: Mar 19, 2024 10:56 AM