Special Report | शिंदे गटासोबतची युती आणि विलीनीकरण असे दोन्ही प्लॅन भाजपने रेडी ठेवलेत
राजकीय जाणकारांच्या मते भाजप शिंदे गटासोबतची युती आणि विलीनीकरण असे दोन्ही प्लॅन रेडी ठेवतोय. जर युतीतच लढले, तर आत्तापासूनची तयारी भविष्यात बार्गेनिंगसाठी कामी येईल आणि जर समजा कोर्टातल्या केसमुळे शिंदे गटाला भाजपात विलीनीकरणाची वेळ आली., तरी ते उमेदवार भाजपचेच उमेदवार ठरतील.
मुंबई : भाजप(BJP) नेत्यांच्या विधानांनी शिंदे गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चांना जोर आलाय. बावनकुळेंनी बुलडाण्यात भाजपचा खासदार होणार असल्याचं म्हटलय. जिथं आता शिवसेनेचे आणि सध्या शिंदे गटात असलेले प्रतापराव जाधव खासदार आहेत. त्यावर जेव्हा फडणवीसांना विचारणा झाली तेव्हा बावनकुळेंचं विधान हे सूचक असल्याचं फडणवीस म्हटल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या खासदार भावना गवळींनी शक्तीप्रदर्शनाची तयारी केलीय. मात्र त्यासाठी लावलेल्या बॅनरवर शिवसेनेपेक्षा भाजप नेत्यांचीच जास्त गर्दी आहे. माहितीनुसार या बॅनरवर वाशिमच्या एकाही शिवसेना पदाधिकाऱ्याचा फोटो नाही. काही दिवसांपूर्वी भाजप लोकसभेसाठी मिशन ४५ म्हणजे ४५ लोकसभांसाठी तयारी करत असल्याची बातमी आली होती. त्या 45 लोकसभांमध्ये काही मतदारसंघ शिंदे गटातल्या खासदारांचेही होते.
पहिला होता कल्याण लोकसभा. जिथं सध्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत कोल्हापूर मतदारसंघ, जिथं शिंदे गटाचे संजय मंडलिक खासदार हातकणंगले लोकसभा. शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने जिंकले आहेत. बुलडाणा लोकसभा इथं शिंदेंकडचे प्रतापराव जाधव खासदार आहेत. हिंगोली इथून शिंदे गटात असलेले हेमंत पाटील खासदार आहेत. पालघर लोकसभा. जिथून शिंदे गटात असलेले राजेंद्र गावित येतात. आणि शिर्डी लोकसभा जिथंही शिवसेनेचे आणि सध्या शिंदे गटात गेलेले सदाशिव लोखंडे जिंकून येतात.
या लोकसभांपैकी बुलडाणा आणि अमरावती या दोन्ही लोकसभांवर बावनकुळेंनी भाजपचा दावा सांगितलाय. बुलडाण्यातून शिंदे गटातले प्रतापराव जाधव आहेत. तर अमरावतीतून अपक्ष खासदार नवनीत राणा. यामागे नवनीत राणा भाजपत विलीन होण्याची चर्चा होऊ लागलीय. मात्र शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांचं काय होणार. हा प्रश्न अनुत्तरित आहे.
राजकीय जाणकारांच्या मते भाजप शिंदे गटासोबतची युती आणि विलीनीकरण असे दोन्ही प्लॅन रेडी ठेवतोय. जर युतीतच लढले, तर आत्तापासूनची तयारी भविष्यात बार्गेनिंगसाठी कामी येईल आणि जर समजा कोर्टातल्या केसमुळे शिंदे गटाला भाजपात विलीनीकरणाची वेळ आली., तरी ते उमेदवार भाजपचेच उमेदवार ठरतील.