तुमची लायकी काय? रोहित पवार माझ्या नादाला लागू नका, नाहीतर...; कोणी दिला इशारा?

तुमची लायकी काय? रोहित पवार माझ्या नादाला लागू नका, नाहीतर…; कोणी दिला इशारा?

| Updated on: Aug 12, 2024 | 2:37 PM

मराठा समाजाची माती आणि वाटोळं कोणी केलं असेल तर याला पवार कुटुंब जबाबदार आहे. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते. राज्याची आणि देशाची सूत्र तुमच्याकडे तेव्हा मराठा समाजाला वाऱ्यावर सोडले. जेव्हा पवार कुटुंब सत्तेतून बाहेर जातो तेव्हाच मराठा आरक्षणाचा विषय उफाळून येतो. असं म्हणत राजेंद्र राऊतांनी पवारांवर हल्लाबोल केला आहे.

सोलापुरातील बार्शी तालुक्यात शरद शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, रोहित पवारांच्या टीकेनंतर राजेंद्र राऊत यांनी जोरदार पलटवार करत प्रत्युत्तर दिलं आहे. तर फक्त बारामती तालुक्याचा विकास करणे म्हणजे राज्याचा आणि देशाचा विकास नव्हे. रोहित पवारांनी आपल्या आजोबांना विचारणे गरजेचे आहे. कोणताही उद्योग न करता तुमची प्रॉपर्टी कशी वाढली आणि कोणाचे कमिशन घेऊन प्रॉपर्टी वाढली त्याचे आधी उत्तर द्या. असे म्हणत राजेंद्र राऊत यांनी पवारांना जाब विचारलाय. तर तुमची लायकी काय? संपूर्ण महाराष्ट्राला लुटणारे तुम्ही दुसऱ्याच्या नावाने ओरडताय, असं म्हणत त्यांनी थेट लायकीच काढली. रोहित पवार तुम्ही किती बँकाना टोप्या घातल्या, कशा जमिनी हडपल्या, मगरपट्ट्यात काय दिवे लावले हे सगळं मला माहिती आहे. माझ्या नादाला लागू नका नाहीतर मी तुम्हाला गारेगारचा गाडा लावायला लावेन, असं म्हणत त्यांनी पवारांना इशाराच दिला आहे.

Published on: Aug 12, 2024 02:37 PM