राज्यात भाजपचं मिशन 125, शाहांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची खलबतं, काय दिल्या सूचना?
महाराष्ट्रात 125 जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची खलबतं सुरू आहेत. बघा काय दिल्या अमित शाहांनी भाजप नेत्यांना सूचना?
आगामी विधानसभा निवडणुकीत जवळपास 50 जागांवर भारतीय जनता पक्षाला विजयाची खात्री असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत असून उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर असणार आहे. तर महायुतीमधील धुसफूस, अंतर्गत कलह हे चव्हाट्यावर नको अशाप्रकारच्या सूचनाही अमित शाह यांनी भाजप नेत्यांना केल्याची माहिती मिळतेय. गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळण्याचेही निर्देश अमित शाहांनी भाजप नेत्यांना दिलेत. यासोबत निवडणुकीच्या वेळी नेत्यांनी संयम ठेवावा, एकजूट असावी, अशाही सूचना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, अमित शाह आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेण्याची शक्यता आहे. तर महायुतीतील प्रमुख नेत्यांसोबत होणाऱ्या महत्त्वाच्या आजच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
Published on: Sep 09, 2024 05:23 PM
Latest Videos