Assembly Election Result 2024 : महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, भाजपनं स्वतःचा मोडला रेकॉर्ड
assembly election Vidhan Sabha result 2024 : महाराष्ट्रात २०१९ साली आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मोदी लाटेपेक्षाही मोठी लाट यंदा आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातील कलांवरून महाराष्ट्रात महायुतीची लाट नाहीतर त्सुनामी आल्याचे पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवावर मात करून एक है तो सेफ है आणि कटेंगे तो बटेंगेचा यासह महायुतीने २०० पारचा नारा दिला होता. याचाच थेट परिणाम महाराष्ट्रात दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते अजूनही पिछाडीवर महायुतीने राज्यात मॅजिक फिगर ओलांडली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात २०१९ साली आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मोदी लाटेपेक्षाही मोठी लाट यंदा आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातील कलांवरून महाराष्ट्रात महायुतीची लाट नाहीतर त्सुनामी आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण यंदा भाजपने स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आहे. सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातील कलांमध्ये भाजप १२६ जागांच्याही पुढे आहे. २०१९ साली झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला १२२ जागा मिळाल्या होत्या. मात्र आता त्याही पुढे जात भाजप १२६ जागांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यात भाजपा-महायुतीची लाट आल्याचे दिसून आले आहे. भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.