Jitendra Awhad | भाजप आम्हाला फार लांब नाही, जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला इशारा

Jitendra Awhad | भाजप आम्हाला फार लांब नाही, जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला इशारा

| Updated on: Dec 11, 2021 | 4:46 PM

"मोठा भाऊ म्हणून आदर करु, मात्र बोलायचे एक आणि करायचे एक हे सहन केल  जाणार नाही," असं राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड शिवसेनेला उद्देशून म्हणाले. ते नवी मुंबईत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते.

“मोठा भाऊ म्हणून आदर करु, मात्र बोलायचे एक आणि करायचे एक हे सहन केल  जाणार नाही,” असं राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड शिवसेनेला उद्देशून म्हणाले. ते नवी मुंबईत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी आव्हाडांनी सूचक इशाराही दिला की, भाजप आम्हाला फार लांब नाही. “आम्ही आघाडी धर्म पाळून विरोधी पक्षात असलेल्या भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर टीका करायची. तुम्ही मात्र पडद्यामागून संबंध ठेवायचे. मग आम्ही शत्रुत्व का घ्यायचं? राजकारणातील गणितं कधीही बदलू शकतात. मौका सभी को मिलता है. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर जायचे याचे पर्याय खुले आहेत,” असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले. येत्या काही महिन्यात महाराष्ट्रातल्या काही महापालिकांच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात एकत्रित सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीतच जुंपण्याची शक्यता निर्माण झालीय. दरम्यान, यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं. 2024 मध्येही महाविकास आघाडीचंच सरकार येईल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असं शरद पवारांनी आपल्याला खासगीत सांगितल्याचं आव्हाडांनी म्हटलं.