Sanjay Ruat | ममता बॅनर्जी आम्हाला भेटल्या ही भाजपला पोटदुखी, संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Ruat | ममता बॅनर्जी आम्हाला भेटल्या ही भाजपला पोटदुखी, संजय राऊतांचा घणाघात

| Updated on: Dec 02, 2021 | 5:12 PM

ममता बॅनर्जी आम्हाला भेटल्या ही भाजपला पोटदुखी आहे. भाजपला आरोप करू द्या. त्यांना आरोपांचे जुलाब होत आहेत. त्यांना आरोपांचा डायरीया झाला आहे. त्यांना तोंडाचा डायरीया झाला आहे. दुर्गंधी काही काळ निर्माण करतात. त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यूपीएच्या अस्तित्वावरच प्रश्नच चिन्ह उपस्थित केला. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एनडीएच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण केले आहेत. एनडीए तरी कुठे अस्तित्वात आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांनी आजही भाजवर जोरदार हल्ला चढवला. ममतादीदी या काय मुंबई लुटायला, ओरबडायला आल्या आहेत का? ममता बॅनर्जी मुंबई लुटायला आल्या असं जे म्हणत आहेत ते मूर्ख लोकं आहेत. माझा प्रश्न आहे की आज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे अर्ध मंत्रिमंडळ घेऊन मुंबईत आले. व्हाटब्रंट गुजरातसाठी ते मुंबईत आले. व्हायब्रंट गुजरात तिकडे. मुंबईत काय कशासाठी? व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईत रोड शो करता, उद्योगपतींना आकर्षित करता ते चालतं का? यालाच मी लूट म्हणतो, असं ते म्हणाले. भाजपला आरोप करू द्या. त्यांना आरोपांचे जुलाब होत आहेत. त्यांना आरोपांचा डायरीया झाला आहे. त्यांना तोंडाचा डायरीया झाला आहे. दुर्गंधी काही काळ निर्माण करतात. त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असा हल्लाही त्यांनी चढवला.