अमित शाह यांचं 'मिशन विदर्भ', दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा अन् 'मविआ'वर जोरदार हल्लाबोल

अमित शाह यांचं ‘मिशन विदर्भ’, दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा अन् ‘मविआ’वर जोरदार हल्लाबोल

| Updated on: Mar 06, 2024 | 1:26 PM

दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या अमित शाह यांनी आपला मोर्च हा विदर्भाकडे वळवला. अकोल्यात अमित शाह यांनी ६०० प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली यामध्ये विदर्भातील सहा प्रमुख मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला.

मुंबई, ६ मार्च २०२४ : केंद्रीय मंत्री अमित शाह हे दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अकोल्यातील आढावा बैठकीत अमित शाह यांनी विदर्भातील सहा जागांचा आढावा घेतला. इतकंच नाहीतर जळगावातून अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या अमित शाह यांनी आपला मोर्च हा विदर्भाकडे वळवला. अकोल्यात अमित शाह यांनी ६०० प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली यामध्ये विदर्भातील सहा प्रमुख मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. अकोल्यात सहा प्रमुख मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर शहांनी जळगावातील युवा संमेलनात सहभागी होत मविआ आणि शरद पवार यांच्यावर जोरादार हल्लाबोल केला. यासोबत अमित शहा हे इंडिया आघाडीवरही तुटून पडले. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचं… ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांना तर शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळे परिवारवादी आघाडीच्या मागे जाऊ नका, असं आवाहन अमित शाह यांनी तरूणांना केलं.

Published on: Mar 06, 2024 01:26 PM